हेडलाईन्स 13-11-2021.
त्रिपुराच्या घटनेचे अमरावती, मालेगाव, नांदेडमध्येही पडसाद उमटले आहेत. दुकानांवर दगडफेक, वाहनाच्या काचा फोडल्या आहेत. शांतता राखण्यासाठी राज्य गृहमंत्र्यांनी आवाहन केले आहे.
1 हजार 532 एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतले, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी माहिती दिली आहे.
भारतीय रेल्वेची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे , तब्बल 20 महिन्यांनंतर पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पुढील काही दिवसांत 1700 रेल्वे धावणार आहे. पूर्वीप्रमाणे तिकिटाचे दर आकारणारले जाणार आहेत.
"भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हे आमचे उदिष्ट, 31 डिसेंबर पर्यंत आणखी 23 घोटाळे उघडकीस बाहेर काढणार", किरीट सोमय्या यांचं मोठं आव्हान.
स्वातंत्र्याबद्दल कंगनाला वादग्रस्त वक्तव्य महाग पडलं ; राजस्थानमध्ये कंगनाच्या विरोधात 2 FIR दाखल करण्यात आले आहेत. सर्व बाजूंनी टिकेची बाजू.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवी मुंबई मधील बेलापूरमधील आरएएफच्या तळावर दिल्ली मधील एनसीबीच्या पथकानं आर्यन खानचा जबाब नोंदविला आहे.
अफगाणिस्तानमधील कंधार शिया मशिदीनंतर नंगरहार येथील मशिदीत स्फोट घडवून आला आहे ; दोघांचा मृत्यू झाला आहे तर, 17 पेक्षा अधिक जखमी झाल्याची माहीती दिली आहे.
गौतम अदानींची एकूण संपत्ती झाली 81 अब्ज डॉलर इतकी आहे. , समूह कंपन्यांचे मार्केट कॅप 10 लाख कोटींच्या जवळ पोहोचले आहे ; मुकेश अंबानी 11व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
अनिल देशमुख यांना 15 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीने केले आहेत ; ईडीच्या कोठडीमध्ये त्रास, छळ सुरु असल्याचा देशमुख आरोप करीत आहेत.
मुंबईतील जम्बो कोविड केअर सेंटर बंद होण्यास सुरुवात झाली आहे ; कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात शुक्रवारी 945 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.तर 41 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यदर 2.12 टक्के इतका आहे ; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्क्यांवर पोहोचले आहे.
Comments
Post a Comment