हेडलाईन्स,1 डिसेंबर 2021
मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा., अशोक चव्हाणांनी राज्य सरकारचे आभार आभार मानले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबत कौशल्य आधारित शिक्षण मिळणार , राज्य सरकारचा इन्फोसिस कंपनीसोबत केलेला करार.
सलग दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दर वाढला आहे., गेल्या वर्षीच्या तुलनेत जीडीपी उणे 7.4 वरुन 8.4 टक्क्यांवर् गेले आहे.
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाला कारभार पाहण्याची परवानगी दिली आहे; राज्य सरकारनं नेमलेल्या मंडळाचे उच्च न्यायालयानं गोठवले अधिकार.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे; अनुयायांनी चैत्यभूमी, दादर येथे न येता घरी राहूनच अभिवादन करण्याचे आवाहन दिले आहे.
उसाने भरलेली ट्रॉली घरावर कोसळली त्यात, 55 वर्षीय आजीसह 8 वर्षांच्या नातीचा हि मृत्यू झाल.; ही हृदयद्रावक घटना परभणीत् घडली.
ममता बॅनर्जी-शिवसेना नेत्यांमध्ये बैठक झाली, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेतली.
स्वतंत्र विदर्भाची मागणी: विदर्भवासियांची इच्छा अधुरीच राहणार कि काय?, वेगळा 'विदर्भ' राज्य होणार नाही?; केंद्र सरकारने संसदेला माहिती दिली.
गायिका शाल्मली खोलगडे अडकली लग्नाच्या बेडीमधे. मुंबईत मिक्सिंग आणि मास्टरिंग इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत लग्नाची गाठ बांधली आहे.
राज्यात मंगळवारी 678 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 942 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्क्यावर पोहोचले आहे.
Comments
Post a Comment